अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता शहरातील व्यापारी पेठ बंद ठेवनेपेक्षा संबंधित रुग्णाचे घर अथवा परिसर सील करण्याचा निर्णय घेणेत यावा असे मत युवा नेते विक्रमसिंह पाचपुते यांनी श्रीगोंदा शहरात वाढत्या रुग्णसंख्या आढावा घेऊन बैठक घेतली असता मत व्यक्त केले.
आ.बबनराव पाचपुते यांच्या सूचनेनुसार युवा नेते विक्रमसिंह पाचपुते,उपनगराध्यक्ष अशोकराव खेंडके, भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, व्यापारी असो.चे सुरेशशेठ भंडारी, राजुशेठ नय्यर, अनिलशेठ बगाडे,

अशोकशेठ बगाडे, अमित बगाडे, विक्रम काळे, विशाल बगाडे, सुरेश शहा, अमोल दंडनाईक, सूर्यवंशी टेलर, नवनीत कटारिया, आनंद कटारिया इ.
व्यापारी वर्गाच्या उपस्थितीत श्रीगोंदा येथे आढावा बैठक घेण्यात आली यावेळी चर्चेदरम्यान युवा नेते विक्रमसिंह पाचपुते म्हणाले प्रशासनाने केलेल्या.
चांगल्या कार्यामुळे श्रीगोंदा शहरातील कोरोना ची संख्या आटोक्यात येण्यास खूप मोठी मदत झालेली असून कोरोना बाबत प्रशासनाकडून अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केले जात आहे मात्र तरीही श्रीगोंदा शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.
शहरात वाढती रुग्णसंख्या पाहता शहरातील व्यापारीपेठ बंद ठेवणे उचित ठरणार नाही त्यामुळे ज्या भागात रुग्ण आढळून येतील तो भाग तेथील नागरिकांशी चर्चा करून बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घ्यावा.
मात्र समाजाला वेठीस धरण्याचे काम प्रशासनाकडून होऊ नये त्यामुळे संबंधित रुग्णाचे घरच सील करण्यात यावे कारण कोरोनाच्या संकटापेक्षा येणारे आर्थिक संकट खूप मोठे असणार आहे,
त्यामुळे आर्थिक संकटाला सामोरे जाण्यासाठी व्यापारीबाजार पेठ चालू ठेवून प्रत्येकाने सामाजिक अंतर व स्वतः ची सुरक्षितता बाळगली तर नक्कीच आपण कोरोनाला हद्दपार करू असा विश्वास पाचपुते यांनी व्यक्त करून प्रशासन करत असलेल्या कार्याचे हि कौतुक केले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved













