आधी मुलीचे फोटो काढले मग व्हायरल करून बदनामीची धमकी; समजून सांगणाऱ्यास दगड व लाकडी दांडक्याने … !

Published on -

Ahmednagar News : सध्या तंत्रज्ञाच्या साहाय्याने अनेकांनी मोठी प्रगती केली आहे. तर दुसरीकडे याच तंत्रज्ञानाच दुरुपयोग करत अनेकांची फसवणूक करण्याच्या घटना देखील घडत आहेत. आज प्रत्येकाकडे मोबाइल फोन आहे. परंतु काहीजण त्याचा दुरूपयोग करत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत.

यात अनेकदा नकळत खासगी फोटो, व्हिडिओ काढले जातात व नंतर संबंधितास पैशांची मागणी केली जाते. जर पैसे दिले नाही तर तुमचा फोटो अथवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली जाते.

अशा घटनात समाजात बदनामी नको म्हणून अनेकजण प्रकरण जागीच मिटवतात देखील मात्र काहीजण समाजात चांगलीच बदनामी देखील करतात. अशीच घटना नगर जिल्ह्यातील सोनई या ठिकाणी घडली आहे.

पाथर्डी तालुक्यातील काही मुलांनी मुलीचे फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली होती. मात्र मुलीचे फोटो व्हायरल करून बदनामी करू नको असे सांगण्यासाठी गेलेल्या एकास मुलीचे फोटो व्हायरल करून बदनामी करू तसेच जीवे मारण्याची धमकी दिली व दीड तोळा सोन्याची चैन बळजबरीने काढून घेऊन मारहाण केल्याची घटना घडली.

या प्रकरणी रुपेवाडी (ता. पाथर्डी) येथील तिघांवर सोनई पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका ३८ वर्षीय इसमाने सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, आदिनाथ संजय मिठे याने आमच्या मुलीबरोबर काढलेले फोटो दाखवून बदनामी केल्याने त्याला समजावून सांगण्याकरीता गेलो असता.

अविनाश संजय मिठे, रवी संजय मिठे, संजय मच्छिद्र मिठे (सर्व रा. रूपेवाडी, ता. पाथर्डी) यांनी शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केली.

तसेच पाठीवर दगड मारून गळ्यातील दीड तोळा वजनाची सोन्याची चैन बळजबरीने काढून घेतली व जीवे मारण्याची धमकी देऊन मुली बरोबरचे फोटो व्हायरल करून समाजात बदनामी करण्याची धमकी दिली.

त्यावरून सोनई पोलीस ठाण्यात वरील आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सोमनाथ झांबरे पुढील तपास करीत आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe