विषारी गवत खाल्याने पाच गायींचा मृत्यू; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-  कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची संकटे काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. नुकतीच विषारी गवत खाल्याने कोपरगाव तालुक्यात गायी मृत्युमुखी पडल्या आहेत.

यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी येथील आबासाहेब भडांगे यांच्या चार गायी दगावल्या तर अंजनापूर येथील संजय गोरक्षनाथ गव्हाणे यांची एक गाय या घटनेत मृत्युमुखी पडली.

दरम्यान प्रथमदर्शनी ही नायट्रेट विषबाधा असल्याची शक्यता आहे. विषारी गवत खाल्याने ह्या गायी दगावल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकांनी व्यक्त केला आहे.

कोपरगाव लघुचिकीत्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ. अजयनाथ थोरे, कोपरगांव पं.स.चे पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप दहे व डॉ. करण खर्डे, डॉ. अशोक भोंडे आदींनी मृत गायींचे शवविच्छेदन करून नमुने घेऊन तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.

शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच जनावरांचा मृत्यु कशामुळे झाला हे कळणार आहे. अचानक गायी दगावण्यास सुरुवात झाल्याने पशुपालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

इतर आजारी जनावरांवर पशुवैद्यकांनी उपचार करून त्यांना वाचविण्यात यश मिळविले आहे. गवत विषबाधेची शक्यता धरून पशुपालकांनी जनावरांना गवत घालतांना काळजी घ्यावी.

नेहमीच्या गवतापेक्षा वेगळे दिसणारे गवत बाजुला काढून टाकावे. सध्या गवत घालणे टाळले तर योग्य राहील. असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment