जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी पाच जणांचा मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-नगर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. बळींची संख्या आता ९६२ झाली आहे, तर दिवसभरात नवे २८३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

नगर शहर व जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून शनिवार सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्ण संख्येत २८३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १५१५ इतकी झाली आहे.

नगर शहर व जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून शनिवार सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ६३, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ७३ आणि अँटीजेन चाचणीत १४७ रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५, अकोले ७, जामखेड ३, कर्जत ४, कोपरगाव १, नगर ग्रामीण १, नेवासे ३, राहाता २, राहुरी ४, संगमनेर ६, शेवगाव ११, श्रीरामपूर ५ अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २३, अकोले ७, कर्जत २, कोपरगाव ४, नगर ग्रामीण ४, नेवासे ५, पारनेर ३, पाथर्डी १, राहाता ४, राहुरी २, संगमनेर १२, शेवगाव १, श्रीगोंदे १ आणि श्रीरामपूर ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment