ड्रेनेजचे तुंबलेले पाणी रस्त्यावर ; नागरिकांचे होतायत हाल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- कल्याण-नगर-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 आहे. हा रस्ता नगर शहरातून जात आहे.या महामार्गाची महापालिकेच्या हद्दीत प्रचंड दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत.

त्यातच महामार्गालगत ड्रेनेजलाईन तुंबल्याने दुर्गंधीयुक्त घाण पाणी या महामार्गावरूनच वाहत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच या रस्त्यावर सीना नदीवर अनेक वर्षांचा कमी उंचीचा पूल आहे.

तो नादुरुस्त आहे. या रस्त्यालगत शिवाजीनगर परिसर हा नगर शहराच्या अत्यंत जवळ असल्यामुळे येथे मोठी लोकवस्ती आहे. या रस्त्याचे काम अनेक वर्षापासून प्रलंबित आहे.

हा रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यातच या ठिकाणी ड्रेनेजलाईन वारंवार तुंबत असून दुर्गंधीयुक्त घाण पाणी महामार्गावरून वाहत आहे.

महापालिकेने या ठिकाणी वारंवार लिकेज होणार्‍या ड्रेनेज लाईनची दुरुस्ती तातडीने करावी अशी मागणी या भागातील नागरिकांकडून होत आहे.

या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये सांडपाणी साचल्याने ठिकठिकाणी चिखल मातीची दलदल निर्माण झाली आहे. या दलदलीतून वाहने चालवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

शिवाजीनगर परिसरात राष्ट्रीय महामार्गावर निर्माण झालेली समस्या सोडविण्याची जबाबदारी जशी राष्ट्रीय महामार्ग विभागाची आहे तशीच ती महापालिका प्रशासनाची सुद्धा आहे. कारण हा महामार्ग जरी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या ताब्यात असला तरी त्या शेजारून जाणार्‍या ड्रेनेज लाईन दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेची आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment