पैशाचे आमिष दाखवण्यापेक्षा विकासात्मक कामांवर भर द्या

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर-नगर विधानसभा मतदार संघातील 110 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 15 जानेवारीला होत आहे.

या अनुषंगाने आमदार निलेश लंके यांनी मोठी घोषणा केली आहे.मात्र त्यांच्या या घोषणेनवरून लंके यांच्यावर टीका केली जाऊ लागली आहे.

पारनेरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध होण्यासाठी अशा गावांना 25 लाखांचा निधी देण्याची घोषणा केली.

गावागावात एकोपा नांदावा, कटूता निर्माण होण्याच्या उद्देशाने आ.लंके यांनी ही अभिनव घोषणा केली. मात्र भाजप नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आ.लंके यांच्या या आवाहनावर टिकेचा सूर लावला आहे.

दरेकर म्हणाले की, राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची योजना वरकरणी चांगली वाटतं असली तरी, गावांना 25 लाख रुपयांच्या बक्षीसाचं प्रलोभन देणं योग्य नाही.

अशा प्रलोभनात्मक योजना सांगण्यापेक्षा त्यांनी मतदारसंघातील विकासात्मक कामांवर खर्च करावा, असे व्टिट दरेकर यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe