Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ बाजार समितीत २ कोटी ८० लाखांचा चारा घोटाळा ? बड्या नेत्यावर आरोप

Published on -

Ahmednagar News : श्रीगोंदे बाजार समितीमध्ये आरोप प्रत्यारोपांचे काहूर माजले आहे. आधी कांदा अनुदानाबाबत कोट्यवधींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता.

आता बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांच्यावर आरोप हल्लाबोल केला आहे.

त्यांनी म्हटले आहे की, बाळासाहेब नाहाटा हे २०१३-१४ मध्ये श्रीगोंदे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते. त्यावेळी, चारा छावणीसाठी २ कोटी ८० लाख रुपये बेरर चेकद्वारे काढले. मात्र, हे पैसे कुठे व कशासाठी खर्च केले, हे दिसले नसल्याचे लेखापरीक्षण अहवालात म्हटले होते.

मात्र, त्यानंतर कोणत्याही संचालक मंडळाने त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. पुन्हा १५ वर्षांचे विशेष लेखापरीक्षण करून त्यात दोषी आढळल्यास नाहाटा यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी दिला आहे. बाजार समिती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत लोखंडे बोलत होते.

लोखंडे यावेळी म्हणाले, गतवर्षी बाजार समितीला २ कोटी ५ लाखांचे उत्पन्न मिळाले. त्यातून ८६ लाखांचा नफा मिळाला. मात्र, आपले कुकर्म लपवण्यासाठी माझ्यावर खोटे आरोप केले जात आहे. विरोधकांच्या कालखंडात ४० लाखांचे बांधकाम केले. त्याची बिले असली, तरी बांधकामच सापडत नाही.

एक विहीर खोदण्यासाठी ४ लाखांचा निधी वापरला, पण विहीरही शोधण्याचे काम मा सुरू आहे. विरोधकांचा लवकरच वि जनतेसमोर भांडाफोड करणार अ असल्याचा इशारा लोखंडे यांनी दिला.

तसेच, २०१६-१७ साली तत्कालीन सभापती धनंजय भोईटे यांचे सह्यांचे अधिकार विरोधी नेत्यांनी एकत्र येऊन काढले होते. मात्र, सहकार नियमानुसार अशी कोणतीही तरतूद नाही. मात्र, तरीही त्यांचे सह्यांचे अधिकार काढून ते उपसभापतीला दिले. त्या काळात अनधिकृत कामकाज झाले असून, त्याचीही चौकशी करणार असल्याचे लोखंडे म्हणाले.

माझी कोणतीही चौकशी करा, मी तयार : नाहाटा

यावर काही मीडियाशी प्रतिक्रिया देताना बाळासाहेब नाहाटा, सभापती, राज्य बाजार समिती महासंघ हे म्हणाले, अतुल लोखंडे हा मोठा कार्यकर्ता आहे. आमच्या कामाचे ऑडिट करा,

नाहीतर सीआयडी चौकशी करा किंवा उच्चस्तरीय चौकशी करा, त्यात मी दोषी आढळलो, तर माझ्यावर कारवाई होईल. उलट लोखंडे यांनीच ११ महिन्यात कसलीही कामे केली नसल्याचे ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe