‘शेतकऱ्यांसाठी ‘तो’ निर्णय घेण्याचा प्रयत्न करणार’ ; माजी आ. कर्डीले म्हणतात …

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-निमगाव वाघा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने शेतकर्‍याना खेळते भांडवलाचे धनादेश वाटप करण्यात आले. कोरोनामुळे ही शेतकरी अडचणीत आला आहे. त्यांना आधार देण्यासाठी जिल्हा बँकेने हा निर्णय घेतला आहे.

निमगाव वाघा येथील 380 शेतकर्‍यांना 3 कोटी 58 लाख व पिंपळगाव वाघा येथील 133 शेतकर्‍यांना 1 कोटी 45 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले म्हणाले, खरीप, रब्बी पिकांचे घेतलेले कर्ज जसे नवे जुने पध्दतीने करता येते, तसेच खेळते भांडवलही नवे जुने करण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न आहे.

जेणेकरून शेतकर्‍यांना कर्ज भरण्यासाठी ओढाताण होणार नाही. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे,

खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुरेशराव सुंबे, बाजार समिती उपसभापती संतोष म्हस्के, रेवननाथ चोभे, दिलीप भालसिंग, संतोष कुलट आदी मंडळी उपस्थित होते.

यावेळी कर्डिले म्हणाले नगर तालुका हा दुष्काळी तालुका आहे. नगर तालुका केंद्रबिंदू मानून मी काम करत आहे.सर्वात जास्त पाठपुरावा करून शेतकर्‍यांना पीक विम्याचा फायदा मिळवून देण्याचे काम केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment