अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- कुकडी प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आता हाच प्राणी प्रश्न पेटला असून यावरून जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.
‘कुकडीच्या इतिहासात आवर्तन सोडण्यास स्थगिती मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. पालकमंत्र्यांनी टंचाई घोषित केली नाही, आमदारांनी पाठपुरावा केला नाही, प्रशासनानेही लक्ष दिलं नाही, त्यामुळं ही वेळ आली आहे.
आपल्या कार्यकाळात असं कधीच झालं नाही. याला सर्वस्वी जबाबदार तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत,’ अशी टीका करत माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
कुकडीतून पाणी सोडण्यास न्यायालयाकडून स्थगिती :- पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पातून पुण्यासह नगर व सोलापूर जिल्ह्यांनाही पाणी दिलं जातं. अहमदनगरमधील श्रीगोंदा, कर्जत आणि सोलापूरमधील करमाळा तालुक्यांना याचा लाभ मिळतो.
यावर्षी धरणात पाणीसाठा शिल्लक असल्यानं अहमदनगर-सोलापूरसाठी ९ मे पासून उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला होता. मात्र, जुन्न्नर तालुक्यातील एक शेतकरी प्रशांत औटी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. कुकडी प्रकल्प आठमाही आहे.
आधीची आवर्तने सोडून झाल्यानं आता पाणी सोडू नये, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यावर न्यायालयानं पाणी सोडण्यास स्थगिती दिली आहे.
त्यामुळं पाणी सुटलेच नाही. आता न्यायालयात सुनावणी सुरू असून पुढील तारीख मिळाली आहे. यावरून नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
आमदार पवारांचे स्पष्टीकरण :- स्वच्छ राजकारण करताना केवळ स्वतःच्या पायाजवळ बघून चालत नाही, तर आजूबाजूच्या लोकांचाही विचार काही लोकांनी करण्याची गरज आहे.
न्याय मागत असताना दुसऱ्यावर अन्याय तर होत नाही ना, याचा विचार प्रत्येकानं करायला हवा. सर्वांना हक्काचं पाणी मिळेल, यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू, असा विश्वास देतो.’ असं पवार यांनी म्हटलं आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम