माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात वाईट वाटते काँग्रेसचे नेतृत्व किती कमकुवत झाले..

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-काँग्रेसचे नेतृत्व किती कमकुवत झाले. याचे वाईट वाटते आहे. एकेकाळी देशाचे नेतृत्व करणारा हा पक्ष किती अधोगतीला, लयाला गेला आहे, अशी टीका भाजपचे नेते, माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे शुक्रवारी ( दि. ११) संगमनेरात एका कार्यक्रमासाठी आले असता. शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर चांगलीच टीका केली. सध्याची काँग्रेस पक्षाची अवस्था पाहिल्यानंतर कोणत्याही सामान्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दुःख होईल. यासाठी मूळ काँग्रेस पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.