अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- महाराष्ट्रातील सध्याचे महाविकास आघाडी सरकार जनतेविरोधी सरकार असून ते फार काळ टिकणार नाही. लवकरच या सरकारचा कार्यक्रम होईल,’ असे वक्तव्य माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी केले आहे.
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नगर जिल्ह्यातील भाजपमधील अनेक जण राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत,’ असे वक्तव्य केले होते. याबाबत शिंदे यांना विचारले असता, ‘त्यांचे हे स्वप्न लवकरच धुळीस मिळेल,’ असा टोला त्यांनी तनपुरे यांना लगावला.
एका बैठकीसाठी माजी मंत्री शिंदे हे नगरला आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले ‘राज्यातील सरकारला एक वर्ष होत आहे. या एक वर्षात सरकारने नेमके काय केले ?
हे त्यांनी जाहीर करावे,’ ते पुढे म्हणाले, ‘राज्य सरकार सातत्याने सांगत आहे की केंद्राने काय केले ? पण केंद्र सरकारने यांना जे दिलं हे या सरकारने नीट वाटले सुद्धा नाही.हे सरकार लोकांच्या हिताचे काही काम करत नाही.
हे सरकार महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील नसून जनतेविरोधी आहे. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही. लवकरच या सरकारचा कार्यक्रम होईल.
सरकारमधील तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात अंतर्गत धुसमत असून केवळ हे पक्ष सध्या एकमेकाला सावरण्याची भूमिका घेत आहे.
राज्यातील हे सरकार कधी जाईल ? कितपत टिकेल ? असे प्रश्न सामान्य लोकसुद्धा विचारतात. कारण लोकांना सरकारकडून जी मदत पाहिजे, ती मिळताना दिसत नाही.असेही ते म्हणाले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved