अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- शेततळ्यात बुडून एका चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान हि दुर्दैवी घटना अकोले तालुक्यातील गणोरे येथे घडली आहे.
या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. समृद्धी स्वप्नील खतोडे (वय ४) असे या मयत चिमुकलीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, गणोरे येथील समृद्धी सकाळी घराजवळील अंगणात खेळत होती.
शेजारीच असलेल्या शेततळ्याचे गेट उघडे राहिल्याने खेळता खेळता समृद्धी ही तळ्याकडे गेली असता तिचा पाय घसरल्याने ती तळ्यात पडली.
घरातील सर्व माणसे गावात गेली होती. वडील हे ग्रामपंचायत निवडणुकीतील मतमोजणी साठी अकोले येथे गेले होते. त्यांना सदर घटनेची माहिती समजताच ते तातडीने घरी आले, तोपर्यंत तिला तळ्यातून बाहेर काढून खासगी दवाखान्यात नेण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
दरम्यान या घटनेबाबत राहुल खतोडे यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली.या प्रकरणाचा अधिक तपास हवालदार बाळासाहेब गोराणे हे करीत आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved