अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपीस पोलिसांनी अटक केली असून त्यास अकोले न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.(Ahmednagar Crime News)
मयूर सुभाष कानवडे (वय 32, रा. संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, आर्किटेक्ट लक्ष्मीकांत उर्फ चेतन अंबादास नाईकवाडी
यांच्याकडून 30 लाख रुपयांची खंडणी उकळल्या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात 2 फेब्रुवारी 2021 रोजी मयूर सुभाष कानवडे याच्यासह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून मयूर कानवडे हा फरार झाला होता. त्यास संगमनेर येथून ताब्यात घेण्यात आले. मयूर कानवडे याचा संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने औरंगाबाद हायकोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता.
मात्र औरंगाबाद हायकोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. तेव्हापासून अकोले पोलीस त्याच्या शोधात होते. अखेर अकोले पोलिसांनी त्यास सापळा रचून संगमनेर येथून ताब्यात घेतले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम