अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- गेल्या वर्षभरापासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगरमध्ये अटक केली.
हरिष ऊर्फ कोंड्या मच्छिंद्र नेटके (वय ३० रा. भास्कर काॅलनी, लालटाकी, नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,
हरिष नेटके व त्याच्या भावाने नोव्हेंबर २०१९ मध्ये प्रकाश खंडागळे यांच्यावर हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
गुन्हा करून पसार झालेला आरोपी नेटके नगर शहरातील बोरुडे मळ्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी आज सकाळी सापळा रचून फरार आरोपी नेटके याला अटक केली आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved