देशसेवा करणाऱ्या ‘त्या’ सैनिकाला नातेवाईकांनीच लुटले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- सैन्यदलातून निवृत्त झालेल्या सैनिकाला पैसे दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून पाच लाखाहून अधिकचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.

दरम्यान हा धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथे घडला आहे. या प्रकरणी मच्छिंद्र मारुती पानसरे, रा. जाखुरी यांनी तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन मारुती रखमाजी उंबरकर,

चंद्रकला मारुती उंबरकर (दोघेही रा. उंबरी बाळापूर) व अर्जुन गणपत आंधळे (रा. प्रतापपूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

त्यातील दोघांना अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील जाखुरी येथील मच्छिंद्र पानसरे सैन्यदलातून 2015 साली निवृत्त झाले. गावी आल्यावर आपली जमापुंजी गुंतवणुकीचा ते विचार करत असताना त्यांचे सख्खे मामा मारुती उंबरकर व अर्जून आंधळे यांनी त्यांना गाठले.

एका कंपनीत पैसे गुंतवणुकीतून चार वर्षात दामदुप्पट मिळवून देण्याचे आमिष दाखवत मच्छिंद्र पानसरे व त्यांची पत्नी वनिता यांच्या नावे 5 लाख व पत्नीच्या नावे दोन हजार रुपयांप्रमाणे 18 हप्ते असे 36 हजार रुपये गुंतवले.

मुदत संपल्यानंतर पानसरे यांनी परताव्याची अनेकदा मागणी केली व ते मिळत नसल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या प्रकरणी त्यांनी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात मामा, मामी व त्यांचा साथीदार या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने मारुती उंबरकर व अर्जून आंधळे यांना अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक राहुल सानप करीत आहेत

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe