अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सणासुदीच्या काळात काळजी घेतली नाहीतर कोरोनाचा प्रसार अधिक गतीने होईल यासाठी नगरपालिकेत गणपती विक्रीची बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये स्टॉल लावण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून त्यावर सर्वांचे एकमत झाले आहे.
करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील मेनरोडवर स्टॉल लावले तर गर्दी होऊन सोशल डिस्टन्स पाळला जाणार नाही. मेनरोडवर स्टॉल लावणे खूपच धोकादायक ठरू शकते. करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गणपती विक्रीचे स्टॉल लावण्यासंदर्भात पालिकेत झाली.
बैठकीत काही स्टॉल मेनरोड, शिवाजी रोड व अन्य ठिकाणी असे सोशल डिस्टन्सचे पालन करून लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पोलीस प्रशासनाने मेनरोड, शिवाजीरोडवर गर्दी होईल म्हणून परवानगी नाकारल्याने आता गणपती विक्रीचे सर्व स्टॉल हे थत्ते मैदानावर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात काल पुन्हा नगरपालिकेत बैठक घेण्यात आली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस नगराध्यक्षा अनुराधा आदिक, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, अशोक उपाध्ये, राजेंद्र सोनवणे, मुख्तार शहा, नगरसेवक रवी पाटील, दीपक चव्हाण, वैशाली चव्हाण तसेच विशाल अंभोरे,
सुनील सुखदरे, कुणाल करंडे, भगवान धनगे आदी उपस्थित होते. जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत गणपती स्टॉलधारकांच्या जागेबाबतचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती.
त्यानुसार संध्याकाळी नगराध्यक्षांनी बैठक घेऊन सोशल डिस्टन्स ठेवून गणपती स्टॉलधारकांना गाळे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यामुळे सर्व स्टॉल हे थत्ते मैदानावरच लावण्यात यावे अशी सूचना मांडली. सर्वांचे थत्ते मैदानावर स्टॉल लावण्याबाबत एकमत झाले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved