अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- महाराष्ट्रातील लावणी सम्राट अशी ओळख असलेल्या राजेश एकनाथ व्यवहारे यांचा मुलगा आकाश व्यवहारे याने गगनभरारी घेणारी कामगिरी करीत भारतीय हवाई दलात गरुड कमांडो म्हणून कार्यरत होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.
मागील वर्षी जुलैमध्ये झालेल्या भारतीय हवाई दलाच्या रॅली भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या आकाश व्यवहारे याने देशपातळीवर 68 व्या क्रमांकाने निवड झाली.

हवाई दलात ‘गरूड कमांडोची पोस्ट’ त्याला मिळणार असून यासाठीचे प्रशिक्षण 15 ऑगस्टपासून बेळगाव (कर्नाटक) येथे सुरु होणार आहे.
गरूड कमांडो ट्रेनिंग 72 आठवड्यांचे असून आकाश या ट्रेनिंगसाठी लवकरच बेळगांवला रवाना होणार आहे. आकाश व्यवहारे याचे दहावीपर्यंतचे शिक्षण नगरमध्येच ऑक्झिलियम हायस्कूलमध्ये झाले असून अकरावी,
बारावी सायन्स त्याने पेमराज सारडा महाविद्यालयात पूर्ण केले आहे. यानंतर त्याने एफ.वाय.बीएस्सीला प्रवेश घेतला असून हे शिक्षण चालू असतानाच त्याची भारतीय हवाई दलात निवड झाली आहे.
आकाशचे मामा, भाऊ भारतीय लष्करी सेवेत आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच त्याने सैन्य दलातील सेवेचे लक्ष्य ठेवले होते.
त्यातही थेट हवाई दलात गरूड कमांडो होण्याची सुवर्णसंधी त्याला मिळाली आहे. या यशाबद्दल आकाशचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा