Numerology Lucky Number : ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रालाही विशेष महत्त्व आहे. खरे तर अंकशास्त्र हा ज्योतिषशास्त्राचा एक भाग आहे. अंक ज्योतिष शास्त्रानुसार, केवळ व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचा भूतकाळ त्याचा वर्तमान आणि त्याचा भविष्यकाळ पाहता येतो. व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचा मूलांक काढला जातो आणि हाच मुलांक व्यक्तीचे भूत, भविष्य आणि वर्तमान सांगत असतो.
व्यक्तीचा मूलांक क्रमांक हा त्याच्या जन्मतारखेनुसार ठरविला जातो. मुलांक हा 01 ते 09 दरम्यान असतो. आता आपण मुलांक कसा काढतात ? हे समजून घेऊया. ज्या व्यक्तीची जन्मतारीख दोन असते त्याचा मुलाखत हा दोन असतो, तसेच ज्याची जन्मतारीख ही 11 असते त्याचा मुलांक सुद्धा 1+1 दोन असतो.

म्हणजेच जन्मतारखेच्या बेरजेवरून मुलांक निघत असतो. दरम्यान, आज आपण अशाच एका मुलांकाची माहिती पाहणार आहोत. आज आपण ज्या मुलांकाची माहिती पाहणार आहोत तो मुलांक असणाऱ्या मुली आपल्या सासूच्या विशेष प्रिय असतात. चला तर मग जाणून घेऊया याबाबत सविस्तर
कोणता आहे तो मुलांक?
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला होतो, त्यांचा मूलांक 3 असतो. या नंबरचा स्वामी ग्रह गुरू आहे. यामुळे या तारखांना जन्मलेल्या मुली खूप भाग्यवान ठरतात. लग्नानंतर ते ज्या घरात राहतात त्या घराचे नशीब बदलतात. इतकंच नाही तर ती तिच्या सासूची आवडती सुद्धा बनते. आपल्या चांगल्या गुणांमुळे या मुली माहेर मध्ये तसेच सासरमध्येही आनंदी राहतात.
३ नंबर मुलांक असणाऱ्या मुली लग्नानंतर सासूच्या आवडत्या बनतात. खरं तर, या मुली काळजी घेणाऱ्या अन फारच प्रेमळ असतात. याशिवाय नात्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा आणतात. या मुली फारच हसमुख स्वभावाच्या असतात. या नेहमी हसतांना दिसतात आणि इतरांना हसवण्याची यांच्यात अद्भुत क्षमता असते. या मुली कोणाच्याही चेहऱ्यावर दुःख पाहू शकत नाहीत.
शिवाय, त्यांच्यात घरातील कोणत्याही गोष्टीवरून वाद होत नाहीत. या गुणांमुळे या सून सासूच्या सून होतात. या मुलींचे वैवाहिक जीवन खूप आनंदी असते. या मुली लग्नानंतर सासरच्यांना आनंदी ठेवतात आणि घराला स्वर्गासारखे सुंदर बनवतात. मुलांक 3 च्या मुली आपल्या पतीसाठी देखील भाग्यवान ठरतात. असे मानले जाते की ते घरात प्रवेश करताच घरात आनंदाचे वारे वाहू लागते. या मुली सामाजिक कार्यात उत्स्फूर्तपणे भाग घेतात.