अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-पारनेर | एक लाख रुपयांच्या धनादेशापोटी एक लाख रुपयेे रोख दिलेले असताना वकिलामार्फत नोटीस का पाठवली, असा जाब विचारित दहा लाख रुपयांचा चेक दे, नाही तर तुझ्या बायकोलाच उचलून नेतो, अशी धमकी (साळवाडी, ता. जुन्नर) येथील अक्षय सुभाष पटाडे या तरुणाने दिली.
तालुक्यातील पाडळी आळे येथे शुक्रवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. यासंदर्भात संदीप प्रभाकर डेरे (वय ४५, डेरे मळा, पाडळीआळे, पारनेर) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात फिर्याद दिली.
जुन्नर तालुक्यातील अक्षय सुभाष पटाडे व किशोर रोहिदास पटाडे (दोघेही पटाडे मळा, साळवाडी, जुन्नर) यांनी तालुक्यातील पाडळीआळे येथील संदीप प्रभाकर डेरे यांच्याकडून कांद्याचे बियाणे घेतले होते. बियाण्याच्या रकमेचा लाख रुपयांचा धनादेश न वटल्याने डेरे यांनी पटाडे यांना नोटीस पाठवली होती.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved