अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- देशात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे, कोरोनाची सर्वाधिक झळ हि महाराष्ट्र राज्याला बसली आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे.
याच अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. करोनाची लस आता येत आहे.
केरळ, मध्यप्रदेश, आसाम, तेलंगणा, तामिळनाडू आदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, आम्ही मोफत करोना लस देणार आहोत. महाराष्ट्रातील जनतेला देखील करोना लस मोफत मिळावी, अशी आमची मागणी आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तसं निर्णय जाहीर करावा,’ अशी मागणी माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली. नगर जिल्हा भाजपच्या वतीने आज, रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते.
यावेळी खासदार डॉ.सुजय विखे, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर आदी उपस्थित होते.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची वाढत्या आकडेवारीला काहीसा ब्रेक लागला आहे. यामुळे नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com