Ahmednagar News : ‘पाणी द्या, मते घ्या’ ! शेतकऱ्यांचा थेट मंत्री राधाकृष्ण विखेंशीच सौदा

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News :  शेवगाव तालुक्यातील वरूर-आखेगावसह इतर गावांमधील पाझर तलाव, बंधारे भरून द्यावेत अशी मागणी येथील शेतकरी अनेक दिवसांपासुन करत आहेत. दरम्यान या शेतकऱ्यांनी थेट मंत्री राधाकृष्ण विखे यांचीच भेट घेतली. वरूर आखेगावसह ९ गावांतील ग्रामस्थांनी ‘मोटार सायकल पाणी यात्रा’ काढून ‘पाणी द्या, मते घ्या’ अशी मागणी करत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची भेट घेतली.

त्यावर पालकमंत्री विखे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कृती समितीसमवेत बैठक लावली जाईल, असे सकारात्मक आश्वासन दिले. शेवगाव तालुक्यातील वरूर-आखेगावसह इतर गावांमधील पाझर तलाव, बंधारे भरून देण्याची योजना आखून त्यास मंजुरी द्यावी या मागणीसाठी कृती समितीचे सदस्य अॅड. शिवाजी काकडे व माजी जि. प. सदस्य हर्षदा काकडे यांच्यासह ९ गावांतील शेकडो ग्रामस्थ शेवगावहून नगरला आले.

काकडे म्हणाल्या, मागील काही वर्षापासून तालुक्यातील दुष्काळी गावांना पाणी मिळावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने आम्ही शासनदरबारी पाठपुरावा करत आहोत. ९ ऑगस्ट २०२३ रोजी ‘क्रांती दिनी’ जलसंपदा विभाग अहमदनगर येथे मुक्काम ठोको आंदोलन केल्यामुळे योजनेच्या सर्वेक्षणाला मान्यता मिळाली.

आता या सर्वेक्षणाला मान्यता देऊन तालुक्यातील दुष्काळी गावांतील पाझर तलाव, बंधारे भरून मिळावेत असे सांगितले. मंत्री विखे यांनी लवकरच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची कृती समितीसोबत बैठक लावू असे आश्वासन दिले असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले असल्याचे काकडे यांनी सांगितले.

अनेक दिवसांपासून मागणी

नऊ गावांतील शेतकरी या मागणीसाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही आहेत. याआधीही या शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे. दरम्यान आता विखे यांच्याशी झालेल्या वार्तालापातून शेतकरी सकारात्मक झाल्याचे समजते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe