शिर्डीत सव्वा लाखाची सोन्याची चैन चोरीस

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- विजयवाडा येथून शिर्डीत साडबाबांच्या दर्शनाला आलेल्या साईभक्तांचे सव्वा लाखाची सोन्याचे चैन चोरीस गेली आहे.

याबावत अभिषेक कामनागरा जयकुमार श्रीराम वय २२ रा. वाहू सेंटर, विजयवाडा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपण आणि आजी व कोटा अंजली हे साइं अन्रपूर्णछत्र, शिडी येथे झोपण्यासाठी जात असताना आजी व कोटा अंजली हे खाली पडले.

तेव्हा तिच्या गळ्यातील सोन्याची चैन तुटून कुठेतरी खाली पडली. यावेळी आजूबाजूला शोध घेतला असता ती मिळून न आल्याने गळ्यातील तुटून पडलेली चैन कोणीतरी अज्ञात चोरट्याने घेवून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सादर चैनीची किंमत सव्वा लाख रुपये असल्याचे फिर्यादीने म्हटले असुन याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोहेकॉ पवार हे करीत आहेत.