अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-नवऱ्याला सांगून वडिलांना पैसे खर्चायला देत नाही. या कारणातून सुनेचे सासऱ्याने दगडाने डोके फोडण्याचा प्रकार काल नगर शहरात घडला.
याप्रकरणी अधिक माहिती अशी कि, नगर शहरात पाईपलाईन रोड भागात गुरुकुल हौसिंग सोसायटी नयर शाळेजवळ राहणारी विवाहित तरुणी सौ. प्रमोदिनी जयकुमार खैरे वय ३३ ही घराच्या अंगणात असतांना सासरे आरोपी केरूजी दशरथ खैरे याने सून प्रमोदिनी हिला शिवीगाळ करुन तू तुझ्या नवऱ्याला पैसे देऊ देत नाही,

file photo
असे म्हणत शिवीगाळ करुन दगडाने डोक्यात मारुन डोके फोडले. सव्वाआठ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला जखमी प्रमोदिनी खैरे या सुनेच्या फिर्यादीवरून सासरा केरुजी दशरथ खैरे याच्याविरुद्ध तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेकॉ शिरसाठ हे पुढील तपास करीत आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved