अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील सर्वच धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. यातच जगभर प्रसिद्ध असलेले अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील श्री साईबाबांचे मंदिर देखील बंदच होते.
मात्र आता साई भक्तांसाठी अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून साईंच्या दर्शनपासून वंचित राहिलेले भक्तांना आता साईबाबाचे दर्शन घेता येणार आहे. राज्यातील मंदिरे खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलं आहे.
कोरोनाच्या संकटामुळे 17 मार्चपासून साई मंदिर बंद असल्याने शिर्डीचं सर्व अर्थकारण ठप्प झालं होत. या अर्थकारणालाही आता चालना मिळणार आहे. मंदिर दर्शनासाठी खुले होणार असल्याने शिर्डीत ग्रामस्थ आणि भाविकांनी एकमेकांना पेढे वाटून जल्लोष साजरा केला आहे.
शिर्डीचं साईमंदिर भाविकांसाठी खुलं झालं असलं तरीही दर्शनासाठी ऑनलाईन बुकींग करावं लागणार आहे. शिर्डीत दररोज सहा हजार भाविकांना दर्शन दिलं जाईल. त्यामुळे ऑनलाईन दर्शन बुकींग असणाऱ्यांनीच शिर्डीत यावं, असं आवाहन साईबाबा संस्थानकडून करण्यात आलं आहे.
भाविकांना सुलभ दर्शनाची व्यवस्था करण्यात आली. सोमवारपासून दर्शनासाठी परवानगी देण्यात येणार असल्याने साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नियमांचे पालन करत भाविकांसाठी हे मंदिर खुलं करण्यात येत आहे. आपली गैरसोय होणार नाही याची भाविकांनी काळजी घ्यावी, असंही आवाहन करण्यात आलं आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved