सरकारी कर्मचार्‍यांसाठी गुड न्यूज !

Published on -

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली होती. परंतु आता या सर्व कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. गणेशोत्सव सणापूर्वीच हे पगार करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.

राज्यातील ‘अ’ आणि ’ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचार्‍यांच्या वेतनात 50 टक्के कपात करण्यात आली होती. ‘क’ वर्गाच्या कर्मचार्‍यांना 75 टक्के वेतन देण्यात आले होते. पण आता उर्वरित पगार देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जुलै महिन्याचा पगार ऑगस्टमध्ये होईल. त्यानंतर तर मार्चमध्ये राहिलेल्या दुसर्‍या टप्प्याची ही रक्कम देण्यात येणार आहे. ही रक्कम गणेशोत्सवापूर्वी कर्मचार्‍यांच्या खात्यात जमा होईल,

याची दक्षता घ्यावी, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत. सरकारी कर्मचार्‍यांसोबतच स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम यांनीही आपल्या कर्मचार्‍यांचे मार्चचे दुसर्‍या टप्प्यातील वेतन द्यावे, असेही आदेशात म्हटले आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News