अहमदनगर Live24 ,17 जून 2020 : येते तीन दिवस जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल. असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त आहेत.
हा पाऊस नगर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी होईल. बुधवारी आणि गुरुवारी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होईल. तसेच सोसाट्याचा वाराही वाहण्याची शक्यता आहे.
मागील दोन दिवसभर निरभ्र आकाश होते. तसेच वारेही होते. त्यामुळे पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसले. मृग नक्षत्राने सलग दोन दिवस दमदार हजेरी लावली.
मंगळवारी मात्र पावसाने विश्रांती दिली. सोमवारी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. सतत कोसळणारा पाऊस आणि नाशिकच्या धरणांमधील पाणी गोदावरीला आल्याने अनेक भागात पुरासारखी स्थिती निर्माण झाली होती.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews