सरकारी बाबुला दिला चोप… न्यायालयाने आरोपीला दिली ‘ही’ शिक्षा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याच्या अनेक घटना यापूर्वीही घडला आहेत. आता जिल्ह्यात पुन्हा एकदा अशाच एका घटनेची पुनरावृत्ती घडली आहे.

एका ग्रामसेवकाला मारहाण केल्याप्रकरणी आरोपीस एक वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे.

जिल्हा न्यायाधीश पी.एन. राव यांनी शनिवारी या खटल्याचा निकाल दिला. दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी कि, अरुण दादा रोकडे (रा.गजानन कॉलनी, नवनागापूर ता. नगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

१८ सप्टेंबर २०१८ रोजी नवनागापूर येथे ग्रामसेवक संजय विश्वनाथ मिसाळ हे कार्यालयात काम करत होते. यावेळी आरोपी रोकडे याने कार्यालयात येऊन मिसाळ यांची गजांची पकडून लाथाबुक्यांनी मारहाण केली.

याबाबत मिसाळ यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहायक पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण यांनी याप्रकरणी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe