आदर्श गावातच यंदा ग्रामपंचायतीची निवडणूक होणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. निवडणूक जाहिर होताच आमदार निलेश लंके यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा 25 लाखांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले होते.

त्यासाठी नगरसह पारनेर तालुक्यातील गावोगावच्या पुढार्‍यांच्या बैठका घेतल्या. त्याला काही प्रमाणात यशही मिळालं. मात्र आता जिल्ह्यातील दोन गावांमधून मोठी बातमी समोर येत आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी गावात काही दिवसांपूर्वी सर्वानी हजारे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत निवडणूक बिनविरोध करण्याचं जाहीर केले.

परंतु शेवटपर्यंत एकमत न होऊ शकल्यामुळे राळेगणसिद्धी गावात निवडणूक रंगणार आहे. तसेच बिनविरोध निवडणुकांसाठी राज्यात ओळखल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यातील आदर्श गावातच यंदा ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे.

आदर्श गाव म्हणून ख्याती पसरलेले नगर तालुक्यातील हिवरे बाजार येथे निवडणूक होणार असल्याने अनेकांच्या नजर येथील निर्णयाकडे लागल्या आहेत.

आदर्श गाव योजनेचे राज्य कार्याध्यक्ष पोपट पवार यांचे हिवरेबाजार हे गाव तीस वर्षांपासून बिनविरोध होत आहे. परंतु, यंदा या गावातही निवडणूक होणार आहे.

पद्मश्री पोपटराव पवार हे सातव्यांदा ग्रामपंचायत निवडणुकीत उतरले असून त्यांनाही निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment