कोट्यवधींच्या थकीत रकमेसाठी ग्रामपंचातीने शिर्डी विमानतळाला बजावली नोटीस

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-ग्रामपंचायत कराची कोट्यवधींची थकीत रकमेसाठी कोपरगाव तालुक्यातील काकडी ग्रामपंचायतीने विमानतळ विकास प्राधिकरणास डेडलाईन दिली आहे.

दरम्यान ग्रामपंचायतीच्या या थकीत कर प्रश्नी राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी याप्रश्नी लक्ष घालावे यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.

दरम्यान काल पालकमंत्री नगर दौऱ्यावर आले होते. यावेळी हि भेट घेण्यात अली होती. यामध्ये ग्रामपंचायतीची शिर्डी विमानतळाकडे असलेली 4 कोटी 2 लाख 48 हजार 56 रुपयांची रक्कम सात दिवसांच्या आत भरा अन्यथा ग्रामपंचायत अधिनियम कायद्यानुसार कारवाई करणार असल्याची

नोटीस काकडी (ता.कोपरगांव) ग्रामपंचायतीने विमानतळ विकास प्राधिकरणास बजावली आहे काकडी मल्हारवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतीचे लेटरहेडवर ग्रामसेवकाचे सही शिक्क्यासह वसुली नोटीस महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या व्यवस्थापकास बजावली आहे.

तसेच या नोटीसच्या प्रती महाराष्ट्र विमान विकास प्राधिकरणाचे व्यवस्थापक मुंबई तसेच गट विकास अधिकारी पंचायत समिती कोपरगाव व तहसीलदार कोपरगाव यांना पाठविण्यात आल्या आहेत सुमारे चार कोटी रुपये कराच्या रकमेची वसुली करण्याकरिता ग्रामपंचायतीने मागणी व नोटीस देऊनही शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाने कराचा भरणा ग्रामपंचायत कडे केलेला नाही.

त्यामुळे शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ शिर्डी यांचे विरुद्ध पुढील कारवाई नोटीस मिळाल्यापासून सात दिवसात करण्यात येईल तसेच वरील प्रमाणे कारवाई करताना आपले नुकसान झाल्यास त्यास ग्रामपंचायत जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी असे या नोटिशीत म्हटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment