अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-कोरोनाचे संकट हळूहळू कमी होऊअगळे आहे. यातच आता जिल्ह्यात सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वत्र कार्यकर्ते तसेच पुढारी मंडळी देखील या कामामध्ये सवतःला झोकून देत आहे.
एकीकडे बिनविरोधाचा नारा देण्याचे काम सुरू आहे तर दुसरीकडे थेट लढती होण्याचे चिन्हे निर्माण झाली आहे. संगमनेर तालुक्यातील 94 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.
कालपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून गावपातळीवरचे राजकारण तापले आहे. मात्र सरपंच पदाचे आरक्षण सदस्यांची निवडणूक झाल्यानंतर घोषित होणार असल्याने इच्छुक उमदेवारांचा जीव टांगणीला लागला आहे.
तर होणार्या 94 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकरिता 45 निवडणूक निर्णय अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त अधिकाऱ्यांना प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी तहसीलदार अमोल निकम, अप्पर तहसीलदार स्वाती दाभाडे, सर्व नायब तहसीलदार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved