महिलांना काँग्रेस पक्षात काम करण्याची मोठी संधी – शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :-शहरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या अनेक महिला आहेत. त्या सतत विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजात काम करत असतात.

जुन्या – नव्यांचा मेळ घालत अहमदनगर शहर जिल्हा महिला काँग्रेसमध्ये काम करण्याची मोठी संधी महिलांना काँग्रेस पक्षात असल्याचे प्रतिपादन शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.

नुकतीच शहरातील काँग्रेस पक्षाच्या प्रमुख महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक शहर जिल्हाध्यक्ष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या, सेवादलाच्या माजी शहर जिल्हाध्यक्ष नलिनीताई गायकवाड,

महिला काँग्रेसच्या राज्य सचिव उषाकिरण चव्हाण, प्रदेश महिला कार्यकारणी सदस्य तथा माजी महिला शहर जिल्हाध्यक्ष सुनीताताई बागडे, माजी महिला शहर उपाध्यक्ष जहीदा झकारिया, ज्येष्ठ कार्यकर्त्या सिंधूताई कटके, निताताई चोरडिया आदी उपस्थित होत्या.

यावेळी नलिनीताई गायकवाड, उषाकिरण चव्हाण, सुनीताताई बागडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात तसेच नगरमध्ये देखील पक्षवाढीसाठी काम जोमाने सुरू आहे.

पक्षामध्ये महिलांना मानाचे स्थान असून काँग्रेस पक्षामध्ये काम करताना महिलांना सुरक्षित वाटते अशी भावना यावेळी महिलांनी व्यक्त केली. यावेळी काळे म्हणाले की, महिला काँग्रेसच्या माध्यमातून शहरामध्ये महिलांचे संघटन उभ करण्यासाठी महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल.

महिला काँग्रेसने शहरातील महिलांचे विविध प्रश्न हाती घेऊन ते सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा. ना.बाळासाहेब थोरात, आ.डॉ.सुधीर तांबे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न धसास लावण्यासाठी काँग्रेस पक्ष निश्चितपणे आक्रमक भूमिका घेईल.

यावेळी युवक काँग्रेसचे विशाल कळमकर, शहर काँग्रेस क्रीडा विभागाचे प्रवीण गीते पाटील, प्रमोद अबूज, अमित भांड, सौरभ रणदिवे, विशाल केकाण आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment