आरपीआयच्या वतीने महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना अभिवादन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या वतीने मार्केटयार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी आरपीआयचे युवक शहराध्यक्ष अमित काळे, जिल्हाध्यक्ष अशोक केदारे, नगरसेवक राहुल कांबळे, नाना पाटोळे, अ‍ॅड. संतोष गायकवाड, विनोद भिंगारदिवे, दिपक गायकवाड, मंगेश मोकळ, युवराज पाखरे, विशाल कटारनवरे, महादेव भिंगारदिवे, आकाश अरुण, प्रविण वाघमारे, विलास साळवे, दया गजभिये, लखन आढाव, संतोष सारसर, विशाल बेलपवार, अमोल पाटोळे, गौतम कांबळे, संदीप आहेर, विवेक भिंगारदीवे, अक्षय भिंगारदिवे, सचिन छजलानी आदिंसह आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

युवक शहराध्यक्ष अमित काळे म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याने दीन-दलितांना जगण्याचा अधिकार मिळाला. बाबासाहेबांनीच लोकशाहीची मुल्ये देशात घटनेच्या रुपात रुजवली.

त्यांच्या कार्यानेच विविधतेने नटलेला देश एकसंघपणे उभा असून, त्यांचे कार्य व विचार आजही दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या विजयाच्या व जय भिमच्या जोरदार घोषणा दिल्या.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment