किराणा दुकान फोडणारा जेरबंद

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :-कर्जत तालुक्यातील राशीनमधील बंद असलेले किराणा दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून ३ लाखांचे किराणा साहित्य लंपास केले होते.

याबाबत कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही चोरी करणारा अक्षय यादव यास तालुक्यातील बारडगावच्या शिवारातून ताब्यात घेवून न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

याबाबत सविस्तर असे की, राशीन गावातील सावतामाळी किराणा स्टोअर्स हे बंद दुकान दि.२१ डिसेंबर रोजी रात्री अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर कापुन दुकानातील तेलाचे डब्बे साबण, शाम्पु, शेंगदाणे, खोबरे, बल्ब ,

बिस्कीट, काजु, बदाम वैगरे खादयपदार्थ असे मिळुन सुमारे ३ लाख ६ हजार रुपये किंमतीचे किराणा सामान व रोख रक्कम चोरुन नेली होती. या बाबत कर्जत पोलीस स्टेशन येथे दि.२२ रोजी गुन्हा नोंद झाला होता.

पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरव अग्रवाल, उपविभागीय पोलीस आधिकारी आण्णासाहेब जाधव, व पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनाखाली

कर्जत पोलिस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस अंमलदार अंकुश ढवळे, भाउसाहेब यमगर, श्याम जाधव, गोवर्धन कदम, सुनिल खैरे, वैभव सुपेकर,

राशीन दुरक्षेत्राचे भाउसाहेब काळे, सागर मेहत्रे, यांना गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून सदरचे दुकान फोडणाऱ्या आरोपी पैकी अक्षय यादव ऊर्फ तारांचद पवार वय १९ वर्ष रा.बारडगाव ता कर्जत यासदि.२६ रोजी शिताफाने बारडगाव शिवारातुन ताब्यात घेवून न्यायालयासमोर हजर केले असता त्यास ५ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

अक्षय पवार याच्याविरुदध कर्जत पोलीस स्टेशनला या पूर्वी बनावट सोने फसवणुक करुन विक्री करणे, घरफोडी, चोरी सारखे गुन्हे दाखल आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!