पालकमंत्री मुश्रीफ गुरुवारी जिल्हा दौर्‍यावर,नुकसानग्रस्तांना देण्यात येणार्‍या मदतीचा घेणार आढावा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :- ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे गुरुवार, दिनांक ०३ डिसेंबर रोजी जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांच्या दौर्‍याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दिनांक 3 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 9-45 वाजता मुंबईहून शिर्डी विमानतळ येथे आगमन व श्री साईबाबा मंदीराकडे प्रयाण.

सकाळी 10 वाजता श्री साईबाबा दर्शन. सकाळी 10-15 वाजता श्री साईबाबा मंदीर येथून अहमदनगरकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे आगमन.

सकाळी 11 वाजता कोरोनामुळे मयत झालेल्या ग्रामसेवक कुटूंबियांना विमा कवच अंतर्गत मदत रु. 50 लाख रकमेचा धनादेश वाटप कार्यक्रम (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय). सकाळी 11-15 वाजता कोरोना सद्यस्थिती व कोरोना दुसरी लाट बाबत आढावा बैठक (स्थळ : समिती कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय).

दुपारी 12 वा. अवकाळी पावसाने नुकसानग्रस्तांना देण्यात येणा-या शासकीय मदतीबाबत आढावा बैठक (स्थळ : समिती कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय).

दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद (स्थळ : नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय). दुपारी 1.30 वाजता राखीव. (स्थळ : शासकीय विश्रामगृह, अहमदनगर). दुपारी 2.30 वाजता शासकीय वाहनाने अहमदनगर येथून शिर्डी विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 3.45 वाजता खजगी विमानाने शिर्डी विमानतळ येथून कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment