अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- खाजगी क्लासवरून सायकलवर घरी जात असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची फिर्याद पिडीत मुलीच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात दिली आहे.
याप्रकरणी सुरज राजेंद्र गुलदगड (रा. नगर) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पिडीत अल्पवयीन मुलगी राहत असलेल्या परिसरात आरोपी सुरज गुलदगड हा राहत होता.
विशेषबाब म्हणजे पिडीत मुलगी सदर आरोपीला आधीपासून ओळखत होते. दरम्यान घडलेली घटना अशी कि, शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पिडीत अल्पवयीन मुलगी खाजगी क्लासवरून घरी जात असताना सुरजने त्याची दुचाकी पिडीताच्या सायकलला आडवी लावली.
सुरज तिच्या जवळ आला व तिला म्हणाला, चल आपण राहुरीला जाऊ. यावेळी पिडीत मुलीने त्याला नकार दिला असताना त्याने बळजबरीने पिडीत मुलीचा हात धरून विनयभंग केला. घडलेली घटना पिडीत मुलीने तिच्या आईला सांगितली.
आईने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गुलदगड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक निरीक्षक किरण सुरसे करीत आहे
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये