अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :-पोस्टाच्या खात्यात जमा करण्यासाठी खातेदारांनी दिलेली रक्कम खात्यात जमा न करता सदर रक्कम लंपास केल्याची घटना कोपरगावात घडली आहे.
दरम्यान रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी डाकपाल विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सह्या करून काढून स्वतःच्या फायद्यासाठी वापरून सुमारे ४० हजार २०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी डाकपालाविरुध्द गुन्ळा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव उपविभागाचे डाक निरीक्षक विनायक सोन्याबापू शिंदे (रा. नाऊर, ता. श्रीरामपूर) यांनी धारणगाव पोस्टातील डाकपाल रवींद्र बाळासाहेब जाधव (वय , रा. बोलकी, पोस्ट करंजी ता. कोपरगाव) यांच्याविरुद्ध सोमवारी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
रवींद्र जाधव हा १ मार्च २०१४ पासून धारणगाव शाखेत डाकपाल म्हणून कार्यरत होता. कोपरगाव उपविभागाचे डाक निरीक्षक विनायक शिंदे यांनी धारणगाव पोस्टातील खातेदारांच्या पासबुकची १२ ऑक्टोबर २०१९ रोजी तपासणी केली असता त्यात अनियमितता आढळून आली.
त्यात सर्व खातेदारांचे बचत खाते, ठेव खात्यासह इतरही खात्यांचे पासबुक तपासले असता खातेदारांनी त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी वेळोवेळी दिलेली रक्कम तब्बल सुमारे ४० हजार २०० रुपये रुपयांचा अपहार जाधव याने केला.
तसेच अनेक खातेदाराचे बनावट हस्ताक्षर करून खातेदारांच्या अपरोक्ष परस्पररक्कम काढून खातेदाराची व पोस्ट खात्याची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी डाकपाल विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved