Ahmednagar News : नगर अर्बन बँक घोटाळ्यात ‘तो’ अटकेत, सायंकाळीच घेतले ताब्यात, डीवायएसपी संदीप मिटके यांची कारवाई

Published on -

नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल बुधवारी सायंकाळी सीए शंकर घनशामदास अंदानी याला नगर शहरातून अटक केली आहे. त्याला आज, गुरूवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेचा पदभार पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी घेतल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही पहिलीच कारवाई करण्यात आली आहे.

नगर अर्बन बँक सध्या चांगलीच गाजत आहे. मुंबईच्या डी. जी. ठकरार अँड असोसिएटस या फर्मने बँकेच्या कर्ज प्रकरणांचे फॉरेन्सिक ऑडीट केले आहे व त्यानुसार १०५ जणांनी बँकेला लुटल्याचे स्पष्ट झाले आहे. या आरोपींचा शोध पोलिसांद्वारे सुरू आहे. यापैकी सातजणांना पोलिसांनी आतापर्यंत पकडले आहे.

यात माजी अध्यक्ष अशोक कटारिया, नगर अर्बन बँकेचे माजी संचालक मनेष साठे व अनिल कोठारी तसेच अधिकारी प्रदीप पाटील व राजेंद्र लुणिया या पाचजणांना मागील महिनाभरात पकडले आहे. तर सचिन गायकवाड व मुकेश कोरडे यांना दीड वर्षांपूर्वी पकडले आहे.

दरम्यान, सीए अंदानी याला उपअधीक्षक मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने काल सायंकाळी नगर शहरातून अटक केली आहे. तो बँकेचा तज्ज्ञ संचालक म्हणून कार्यरत होता. त्याने कर्जदारासोबत व्यवहार केल्याची माहिती असून पोलीस त्याला आज न्यायालयासमोर हजर करणार आहे. त्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी करण्यात येणार आहे.

पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली झाली आहे. त्यामुळे अर्बन बँक घोटाळ्याचा तपास त्यांच्या मार्गदर्शनाखाली होईल. त्यांची एकंदरीत धडाकेबाज कामगिरी पाहता ठेवीदारांना लवकरच न्याय मिळेल अशी आशा ठेवीदारांच्यात निर्माण झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News