अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- जनप्रबोधन करूनही समाजात बालविवाह होत असल्याचे अनेक प्रकरणे समोर येत आहेत. असेच एक प्रकरण अहमदनगरमधील कोपरगावमध्ये घडले.
परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हा बालविवाह टळला. पोलिसांनी वधू-वराच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी कुंभारी भागात घडली.
एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी (26जुलै) सकाळी 11 वाजेच्या सुमारास स.फौ.शैलेंद्र गंगाधर ससाणे पोकॉ संदीप शांताराम काळे,
क्लार्क आनंद बारसे पोलीस पाटील बाबासाहेब मगनराव गायकवाड यांनी तातडीने या भागात धाव घेत संबंधितांची चौकशी केली. मुलीचे वय 16 वर्षे 7 महिने 26 दिवस असल्याने ती अल्पवयीन आहे
ती तसेच नवरदेवाचेही वय 18 वर्षे 11 महिने असल्याने त्यास 21 वर्षे पूर्ण नसतानाही मुलीचे व मुलाचे आई वडील लग्न करण्यास तयार झाले होते.
सदरची बाब ही बालविवाह प्रतिबंधक कायद्याचा भंग करणारी असल्याने जेऊर कुंभारीचे मुलीचे आई-वडील आणि घुलेवाडीच्या नवरदेवाचे
आईवडिल यांच्या विरुध्द पोलीस पाटील बाबासाहेब मगनराव गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
-
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा