अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू आहेत. वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षातील कॉस्ट अॅण्ड वर्क अकाउंट- 3 या विषयाचा पेपर सुरू असताना बाणेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थिनीच्या काही हालचालींवरून ती प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय सदर पर्यवेक्षिकेस आला.
तिने याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य विजय जाधव यांच्या कानावर सदर बाब घातली. त्यांनी भिंगार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. परंतु यातील मुख्य आरोपी पसार असून त्याला अटक केल्यास अनेक गौडबंगाल बाहेर येण्याची शक्यता आहे. एका आरोपीला अटक केली असली तरी या गुन्ह्यातील अन्य तीन आरोपी पसार आहेत.

पसार असलेल्या तिघांपैकी एक आरोपी शहरातील नामांकित महाविद्यालयाचा शिक्षकोत्तर कर्मचारी आहे. मात्र, तो ज्या महाविद्यालयात नोकरी करतो ते महाविद्यालय, संस्थाचालक त्याला या प्रकरणात वाचविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे समजले.
अधिक माहिती अशी: परीक्षा सुरु असताना बाणेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थिनी कार्तिकी बोधले हीने तिच्या मोबाईवरून शिवा साबळे, सनी कांबळे, गौरव सोनार यांना प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅप केली.
यावेळी वर्गावर पर्यवेक्षक असलेल्या शिक्षिकेच्या ही बाब निदर्शनास आली. तिने प्राचार्यांना सांगितले व त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली. यातील आरोपी सनी कांबळे याला पोलिसांनी अटक केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved













