अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात बदल्यांचे सत्र सुरु आहे. नुकतेच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्याबाबतचे आदेश काढले आहे.
यामध्ये नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांची विनंतीवरून शेवगाव पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी बदली करण्यात आली.

सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. त्यांच्या जागी शिर्डी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांची नियुक्ती करण्यात आली.
तर शिर्डी वाहतूक शाखेच्या निरीक्षकपदी नियंत्रण कक्षातील नारायण न्याहळदे यांची बदली करण्यात आली. सर्व पोलीस निरीक्षकांना बदलीच्या ठिकाणी तत्काल हजर होण्याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक पाटील यांनी दिली आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com