अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथे बहिणीला त्रास का देतो म्हणत एकाच्या डोक्यात फावडे घालून चुलत मेव्हाण्याने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
या मारहाणीत संजय गोरक्ष कदम, वय ४५ रा. सलाबतपूर, ता. नेवासा हे गंभीर जखमी झाले असुन त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी जखमी संजय कदम यांचे चुलत भाऊ मच्छिंद्र जगन्नाथ कदम,रा. सलाबतपूर, ता.नेवासा यांनी पाथर्डी पोलिसात फिर्याद दिल्यावरून आरोपी भाऊराव उर्फ भावड्या अण्णा म्हस्के, वय २५ रा. आडगाव, ता. पाथर्डी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादीत म्हटले आहे की, जखमी चुलत भाऊ संजय गोरक्ष कदम हे त्यांची पत्नी हिला आणण्यासाठी माहेरी आडगाव येथे गेले असता तेथे असलेला चुलत मेव्हणा आरोपी भाऊराव उर्फ भावड्या अण्णा म्हस्के याने तू ‘माझ्या बहिणीला त्रास का देतो असे म्हणुन फावडे डोक्यात मारून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
पत्नीने पती संजय यांना माहेरी आडगावला घेण्यासाठी बोलावले होते. तेव्हा हा प्रकार घडला. आरोपी भाऊराव उर्फ भावड्या म्हस्केला अटक करण्यात आली असून काल सकाळी १० वा हा प्रकार घडला.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved