‘तो’ तलाठी वाळू माफियांकडून हप्ते घेतो; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  अवैध वाळू उपसा, वाळू वहातूक, वाळू माफिया हे शब्द जिल्ह्याला काही नवीन राहिले नाही. जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि त्यावरील कारवाई असे प्रकार बऱ्याचदा घडलेले आहेत.

या लोकांशी महसूल मधील काही लोकांचे लागेबांधे असल्याचे आरोप अनेकदा केले जातात. आता कर्जत तालुक्यातील येसवडी येथील बळीराम अंकुश कांबळे

यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन तालुक्यातील तलाठी वाळू माफियांकडून ‘वसुली’ करत असल्याची तक्रार केली आहे. तसेच त्यांनी याची दखल घेऊन कारवाई न झाल्यास उपोषणाचाही इशारा दिला आहे.

तहसीलदारांना 2 जुलै रोजी निवेदन देऊन या प्रकाराची पाहणी करावी अशी मागणी करण्यात आली. मात्र त्याची दखल घेतली नसल्याने कलेक्टर कार्यालयाकडे तक्रार केली आहे.

या निवेदनात तलाठी घेत असलेल्या हप्त्यांचे आकडे देण्यात आले असल्याने महसूल विभागाची लक्तरे वेशीवर टांगली असल्याचे दिसत आहे. बारडगाव, येसवडी,

ताजू, बेलवंडी, कारखाना येथील तलाठ्यांचे हे आकडे असून ते 30 हजार ते 70 हजार रुपयांच्या दरम्यान असल्याचे निवेदनात नमूद केलेले आहे.

याबद्दल ‘संबंधित तलाठ्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. त्यांच्याकडून खुलासा आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल’ अशी प्रतिक्रिया कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment