अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- कोपरगाव तालुक्यातील वाळू व्यावसायिकांवर कारवाई न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सजा कुंभारी येथील तलाठी सुनील मच्छिंद्रनाथ साबणे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केली.
वाळूच्या वाहनांवर कारवाई न करण्यासाठी सजा कुंभारी येथील तलाठी साबणे याने संबंधित व्यावसायिकाकडून दरमहा ५ हजारांची लाच मागितली होती.

file photo
ती लाच स्वीकारताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहात पकडले. ही कारवाई पोलिस अधीक्षक सुनील कडासने,
अतिरिक्त अधीक्षक नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मृदुला नाईक, उज्ज्वलकुमार पाटील, कुशारे, सचिन गोसावी, प्रवीण महाजन, दाभोळे यांच्या पथकाने केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा