संगमनेर तालुक्यातील ‘हे’ गाव झाले पाणीदार ; बंधारे भरले, मंत्र्यांच्या प्रयत्नास यश आले

Published on -

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- सध्या पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. समाधानकारक पाऊस सर्वत्र झाला आहे. त्यामुळे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने लक्ष पुरवून केलेल्या विकासकामांमुळे संगमनेर तालुक्यातील देवकौठे गाव आज पाणीदार झाले आहे.

भोजापूर धरणाच्या चारीचे पाणी व पावसाचे पाणी एकत्रित आल्याने देवकौठे येथील सर्व बंधारे तुडूंब भरल्याने सर्व शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने विविध विकास कामांसह अकरा सिमेंट बंधारे बांधले. याचबरोबर नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांच्या निधीतून दोन बंधार्‍यांची निर्मिती करण्यात आली.

यावर्षी या भागात खूप चांगला पाऊस झाला. थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून भोजापूर धरण पूरचारीचे पाणीही पिंपळे तलावामार्गे देवकौठेपर्यंत पोहोचले.

पावसाचे पाणी व भोजापूर चारीचे पाणी एकत्रित आल्याने देवकौठेमधील सर्व बंधारे तुडूंब भरले आहेत. तसेच सुमारे 14 वर्षांनी देवी नदीही वाहती झाली, त्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भोजापूर चारीचे पाणी निमोण, तळेगाव भागातील प्रत्येक गावात पोहचविण्यासाठी सातत्याने आढावा घेतला असून इंद्रजीत थोरात यांनीही पाठपुरावा केला असून

मंत्री थोरात यांच्याकडे राज्यात मोठी जबाबदारी असूनही पाणीप्रश्न सोडवण्यासाठी ते कायम आढावा घेत असल्याचे संगमनेर तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष इंजि. सुभाषराव सांगळे यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News