या पुढील काळात जिल्ह्याच्या विकासासाठी काम करणार – शिवाजी कर्डिले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-  गेल्या २५ वर्षांमध्ये विकास कामांत कधीही राजकारण केले नाही. प्रत्येक पक्षामध्ये एकमेकांमध्ये मतभेद, नाराजी असते. खासदार सुजय विखे आणि मी तर भाजप पक्षाचे आहोत.

आमच्यातील समज गैरसमज व मतभेद आता संपुष्टात आले आहेत. या पुढील काळात जिल्ह्याच्या विकासासाठी काम करणार आहे, असे प्रतिपादन माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले.

नगर तालुका बाजार समितीच्या शेतकरी निवासाच्या सभागृहास कै. विश्वासराव भापकर (लेले काका) यांचे नाव देऊन अनावरण करण्यात आले. तसेच नूतन भाजप पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सभापती अभिलाष घिगे, व्हा. चेअरमन संतोष म्हस्के, भायुमोचे सरचिटणीस अक्षय कर्डिले, संचालक दिलीप भालसिंग,

वसंत सोनवणे, शिवाजी कार्ले, बाबासाहेब जाधव, संतोष कुलट, बबन आढाव, दीपक कार्ले, सुनिता दळवी, शरद दळवी, रभाजी सूळ, शाम पिंपळे आदी उपस्थित होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment