अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील निमगाव टेभी येथील शेतकरी कैलास दशरथ कदम, वय ५५ याने भाऊबंद आरोपी यांना म्हटले की, तुम्ही माझी पाण्याची बारी असताना माझ्या बारीत पाण्याची मोटार का चालू केली? असा जाब विचारल्याने दोघा जणांनी कैलास दशरथ कदम यांना लाथाबुक्याने मारहाण करुन खोऱ्याच्या दांड्याने डोक्यात मारून डोके फोडून जखमी केले.
रात्री अकरा वाजता हा प्रकार घडला. जखमी शेतकरी कैलास दशरथ कदम यांच्या फिर्यादीवरून आरोपी भाऊबंद विकास नागू कदम, चेतन्य विकास कदम दोघे रा. निमगाव टेंभी,
ता. संगमनेर यांच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोनि पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हेकॉ बर्वे हे पुढील तपास करीत आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved