आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना दिल्या ‘या’ सूचना !

Published on -

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-औरंगाबादहून पुण्याला जात असताना मंगळवारी सायंकाळी आरोग्य मंत्री राजेश टोपे नगरमध्ये थांबले. त्यांना केंद्रीय आरोग्य खात्याशी व्हिसी असल्याने त्यांनी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून या व्हिसीला हजेरी लावली.

व्हिसी संपल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडून जिल्ह्यातील करोनाचा आढावा घेतला. त्यात जिल्ह्यातून जास्तीजास्त करोना चाचण्या करा, विशेष करून झोपडपट्टी भागात चाचण्या वाढवा,

कोरोना रुग्णांना संस्थात्मक विलग करा आदी सूचना दिल्या. पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंगसह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यावेळी हजर होते.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News