हृदयद्रावक ! कांद्यास पाणी देण्यासाठी गेला आणि…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील सातवड गावामध्ये हृदयद्रावक घटना घडली. शेतात कांदा पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे.

या घटनेमुळे गावात हळहळ पसरली आहे. सचिन रमेश गोरे (वय २४) असे मृत युवकाचे नाव आहे. देवराई येथील रमेश गोरे यांची जमिन सातवड शिवारात आहे.

रात्री लाईट असल्याने रमेश गोरे यांचा मुलगा सचिन रमेश गोरे ( वय २४) कांदा पिकास पाणी देण्यासाठी रात्री गेला होता. त्याच्या शेजारच्या शेतीला त्यांचे चुलते यांनी तार कंम्पाउंड केले होते.

त्या तारेमध्ये विजेचा प्रवाह सोडलेला होता. रात्री २ वाजण्याच्या सुमारास सचिन त्या कम्पाउंडच्या तारेला चिकटला व तो जागीच मयत झाला. सचिनचे मागील वर्षी लग्न झाले होते. रमेश आसाराम गोरे यांना सचिन एकुलता एक मुलगा होता.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment