जोरदार पावसाने ‘ह्या’ गावात दोन दशकानंतर झालंय ‘असे’ काही

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्याच्या काही भागात मागील दोन दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसाने अनेक ठिकाणी दाणादाण उडाली आहे.

पिंपरी निर्मळमध्येही काल पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने दोन दशकानंतर प्रथमच सांडव्यामधून, नदी नाल्यांमधून पाणी वाहते झाले आहे. या पावसामुळे साखळी बंधारे, ओढे, नाले गेल्या अनेक दशकानंतर प्रथमच वाहते झाले. मोठ्या प्रमाणात आलेल्या पाण्यामुळे गावातील आंब्याचा मळा वस्तीचा संर्पक तुटला असून

वस्तीवरील तीन-चार घरांमध्ये पुराचे पाणीही घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. पिंपरी निर्मळ बाभळेश्वर महसुल मंडळात येते. दरवर्षी सष्टेबर महिन्यात या मंडळात सरासरी 139 मी.मी. पाऊस पडतो. मात्र चालू वर्षी अवघ्या चारच दिवसात 111 मी.मी. इतका पाऊस झाल्याने ओढे नाले तंडुब भरुन वाहते झाले आहेत.

या पावसाने मात्र शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे खरीप पिकांची चांगलीच दाणादाण उडाली. मका, कपाशी, ऊस, सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन उभी असलेले पिके भुईसपाट झाले आहे. या पावसामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाने कुठे शेतात पाणी साचले.

तर कुठे बाजरी पीक भूईसपाट झाले. परिसरातील बाजरी, भुईमूग, मका, ऊस, जनावरांचा चारा आदी पिकांमध्ये पाणी साचले. सुरुवातीला जोमात आलेले कपाशीचे पीक आता मोठ्या प्रमाणात पाते गळू लागल्यामुळे धोक्यात येऊ लागले आहे. या पावसामुळे झाडांची खालची पाने लालसर-पिवळी पडू लागली आहेत.

कपाशीवर मावा-तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. काही ठिकाणी कपाशीचे पीक पाण्यात डुंबत होते. तर काही ठिकाणी जास्त पाण्यामुळे कापसाचे रोपटे वाहून गेल्याचे प्रकार घडले आहेत. शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीचे शासनाने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी सरपंच डॉ. मधुकर निर्मळ यांचेसह शेतकर्‍यांनी केली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment