पुण्यात पावसाने दाणादाण, सात जणांचा मृत्यू ! सांगली, साताऱ्यातही रौद्ररूप

तुफान पावसाने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला झोडपून काढले असून, सांगली महापुराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे, तर सातारा जिल्ह्यात तुफान पावसाने हाहाकार उडाला आहे. कोयनेचे सहा दरवाजे उघडण्यात आले.

Ahmednagarlive24 office
Published:
pune rain

तुफान पावसाने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला झोडपून काढले असून, सांगली महापुराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे, तर सातारा जिल्ह्यात तुफान पावसाने हाहाकार उडाला आहे. कोयनेचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून,

त्यामुळे आगामी काळात पुराची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तिकडे कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही पावसाने कहर केला असून, जगबुडी नदी धोक्याची पातळी ओलांडून रौद्ररूप धारण करून वाहत आहे.

सांगली जिल्ह्यासह कृष्णा, वारणा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरूच आहे. वारणा धरणातून १० हजार, कोयना धरणातून २१ हजार ५० व कण्हेर धरणातून ५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातील पाणी शुक्रवारी (दि. २६) दुपारनंतर सांगलीत पोहोचणार आहे.

पुण्यात सात मृत्यू
पुणे जिल्ह्यात गुरुवारी पावसाने तुडं बॅटिंग केली. या पावसात सात जणांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. तर तीन जण बेपत्ता झालेत.

पावसाच्या हाहाकाराने तीन युवकांचा डेक्कन भागात शॉक लागून तर एकाचाच कात्रज भागातून वाहणाऱ्या आंबील ओढ्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. एक जण मुठा नदीत, एक जण इंद्रायणी नदीत तर ताम्हिणी घाटात दरड कोसळून एक मृत्युमुखी पडला.

समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत सक्रिय आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी ते मुसळधार असा पाऊस सुरू आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीने हाहाकार निर्माण झाला आहे.

तर विदर्भात मुसळधार आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे. पुणे जिल्ह्यात पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावली. घाटमाथ्यासह संपूर्ण जिल्ह्यात विक्रमी पावसाने दाणादाण उडवून दिली. २४ तासांत ताम्हिणी घाटात राज्यात सर्वाधिक ५५६ मि.मी. इतका पाऊस झाला.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe